देशी कट्टा अन् तीन जीवंत काडतुसासह आरोपीस अटक
By दयानंद पाईकराव | Updated: May 5, 2024 00:12 IST2024-05-05T00:11:59+5:302024-05-05T00:12:20+5:30
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दत्तात्रयनगर फायर ब्रिगेड ऑफीसच्या मागील भिंतीजवळ सक्करदरा लेक गार्डन ते सोनझारी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोपेडवर असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले.

देशी कट्टा अन् तीन जीवंत काडतुसासह आरोपीस अटक
नागपूर : देशी कट्टा आणि तीन काडतुसासह सक्करदरा पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालीम नथ्थु शाहु (३५, रा. लोहदा गाव, ता. करबी जि. चित्रकुट, उत्तरप्रदेश ह. मु. संकल्पनगर खरबी वाठोडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सक्करदरा पोलिसांचे पथक शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ५.२० वाजता गस्त घालत असताना त्यांना आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दत्तात्रयनगर फायर ब्रिगेड ऑफीसच्या मागील भिंतीजवळ सक्करदरा लेक गार्डन ते सोनझारी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोपेडवर असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले.
त्याच्या जवळ लोखंडी देशी बनावटीचा कट्टा व पिवळ्या रंगाचे ३ जीवंत काडतुसे आढळली. त्याच्या ताब्यातून १५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा, १५०० रुपये किमतीची ३ जीवंत काडतुसे, ७० हजार रुपये किमतीची दुचाकी, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई झोन ४ चे उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल ताकसांडे, उपनिरीक्षक विलास गोरे, हवालदार ज्ञानेश्वर बांते, धर्मेंद्र नितनवरे, गोविंद देशमुख, दिपक रोहणे, निलेश शेंदरे यांनी केली.