Accident while repairing elevator in Nagpur, youth dies | नागपुरात लिफ्ट दुरुस्त करताना अपघात, तरुणाचा मृत्यू

नागपुरात लिफ्ट दुरुस्त करताना अपघात, तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका अपार्टमेंटमध्ये बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करताना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. साहेब शेख गफार शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो नुरी कॉलनी, जरीपटका येथे राहत होता.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजनगरमधील अमरदास अपार्टमेंटमध्ये असलेल्या लिफ्टचा दरवाजा खराब झाला. त्यामुळे रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास साहेब शेख लिफ्टचा दरवाजा दुरुस्त करीत होता. सुरक्षेसाठी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे अचानक संतुलन बिघडल्याने तो तिसºया माळ्यावरुन खाली पडला. डोक्याला जबर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तेथील मंडळींनी मेयो इस्पितळात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ४.३० च्या सुमारास त्याला मृत घोषित केले. फारुक शेख सुलेमान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Accident while repairing elevator in Nagpur, youth dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.