नागपुरातील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या गाडीला अपघात; चार जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 16:37 IST2017-09-30T12:46:28+5:302017-09-30T16:37:36+5:30

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला आहे.

Accident in train on Dikshitbha road in Nagpur; Four people killed on the spot | नागपुरातील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या गाडीला अपघात; चार जण जागीच ठार

नागपुरातील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या गाडीला अपघात; चार जण जागीच ठार

ठळक मुद्देनागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला आहेअपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. 

वर्धा- नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्सची ट्रॅक्सला धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. नांदेड येथून नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाणाऱ्या क्रुजरला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने हा अपघात झाला. देवळी मार्गावरील सेलसुरा जवळ रात्री दोन वाजता सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात क्रूजरमधील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

धम्मचक्र प्रवर्तनदिन निमित्य नांदेड येथून क्रुझर गाडीने ११ जण नागपूरकडे जात होते. परंतु वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ भरधाव येणाऱ्या टॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने हा भीषण अपघात झाला यात अरविंद मारोती खंडारे(३३), दिलीप संभाजी खंडारे(३५), शिवाजी शंकर ढगे(३८), विठ्ठल खडसे(४२) यांचा मृत्यू झाला, तर या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Accident in train on Dikshitbha road in Nagpur; Four people killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात