नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 10:10 IST2019-05-15T10:10:42+5:302019-05-15T10:10:59+5:30

दुचाकीवर जात असलेल्या दोन तरुणींना मागून येणाऱ्या रेती टिप्परने दिलेल्या धडकेत या दोन्ही तरुणी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

Accident on Nagpur-Bhandara road; Two girls killed | नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणी ठार

नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दुचाकीवर जात असलेल्या दोन तरुणींना मागून येणाऱ्या रेती टिप्परने दिलेल्या धडकेत या दोन्ही तरुणी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. नागपूर-भंडारा रोडवरून जात असलेल्या या दोन कॉलेजवयीन तरुणींना मागून येणाऱ्या टिप्परने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या दोघीजणी टिप्परच्या खाली आल्या आणि काही अंतर फरफटत गेल्या. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार त्यांच्या शरीराचे त्यात तुकडे झाले होते. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Accident on Nagpur-Bhandara road; Two girls killed

टॅग्स :Accidentअपघात