वीज मंडळाच्या लाचखोरांना एसीबीचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:09 PM2017-10-24T14:09:04+5:302017-10-24T14:10:59+5:30

वीज चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा धाक दाखवून पाच हजारांची लाच मागणाºया वीज मंडळाच्या (एसएनडीएल) दोन कर्मचाºयांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुसक्या बांधल्या.

ACB jolt to power bureau's bribe | वीज मंडळाच्या लाचखोरांना एसीबीचा झटका

वीज मंडळाच्या लाचखोरांना एसीबीचा झटका

Next
ठळक मुद्देपाच हजारांची लाच दोघांच्या मुसक्या बांधल्या

आॅनलाईन लोकमत
नागपूर : वीज चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा धाक दाखवून पाच हजारांची लाच मागणाºया वीज मंडळाच्या (एसएनडीएल) दोन कर्मचाºयांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुसक्या बांधल्या. पराग अविनाश वैरागडे (वय २५) आणि अजहर मुस्तफा खान (वय २८) अशी लाचखोरांची नावे आहेत. ते वीज मंडळाच्या वसुली पथकात फिल्ड एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत.
रामेश्वर नंदनवार हे टिमकी दादरा पुलाजवळ राहतात. पत्नीचे नावाने त्यांनी काही दिवसांपूर्वी घर घेतले होते. वीजेचे मिटर अद्याप जुन्याच घरमालकाच्य नावे आहे. तीन महिन्यांपूर्वी वीज बील थकीत असल्यामुळे त्यांच्या घराचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे नंदनवार यांनी शेजाºयांकडून वीज पुरवठा घेतला. काही दिवसांपूर्वी एसएनडीएलच्या कर्मचाºयांनी या अवैध जोडणीचे चित्रीकरण केले होते. ते दाखवून खान आणि वैरागडे या दोघांनी नंदनवार यांना धमकावणे सुरू केले. तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा धाक दाखवून आरोपींनी नंदनवार यांना गुन्हा दाखल न करण्याकरिता तसेच वीज बिलावरील व्याज माफ करून खंडीत वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याकरिता पाच हजारांची लाच मागितली होती. ऐन दिवाळीच्या सणात अंधारात राहण्याची स्थिती आणून आरोपी खान आणि वैरागडेने लाचेसाठी वेठीस धरल्यामुळे नंदनवार यांनी एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याकडे तक्र ार नोंदवली. पाटील यांनी तक्रारीची पडताळणी करून घेतल्यानंतर सोमवारी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, सापळा रचण्यात आला.
दिवसभर धावपळ
लाचेची रक्कम देण्यासाठी नंदनवार यांनी वैरागडे सोबत सोमवारी दुपारपासून संपर्क साधणे सुरू केले. त्याने बराच वेळ टाळल्यानंतर ही रक्कम खानकडे देण्यास सांगितले. खाननेही इकडे तिकडे फिरविल्यानंतर रात्री ७.३० वाजता लाचेची रक्कम स्विकारली. त्याचवेळी त्याच्या एसीबीच्या पथकाने मुसक्या बांधल्या. त्यानंतर पोलिसांनी वैरागडेची शोधाशोध केली. रात्री १० वाजेपर्यंत तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्यालाही पकडण्यात आले. दोघांच्याही घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींविरूध्द तहसील ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. एसीबीचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, हवालदार सुनील कळंबे, शिपाई सरोज बुद्धे, दीप्ती मोटघरे, शिशुपाल वानखेडे यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: ACB jolt to power bureau's bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा