शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

नागपूर जिल्ह्यातील लोहारीसावंगा येथे लाचखोर वनरक्षकावर एसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:08 AM

ACB action परवानगी नसताना ताेडलेली सागाची झाडे वन विभागाने ताब्यात घेतली. ती झाडे परत करण्यासाठी तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकाने लाच स्वीकारण्यास नकार दिला व ताे लगेच पळून गेला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक (ॲन्टी करप्शन ब्युराे-एसीबी) विभागाच्या पथकाने त्याच्याविराेधात गुन्हा नाेंदविला.

ठळक मुद्दे ताेडलेली झाडे परत करण्यासाठी मागितली लाच

लाेकमत न्यूज नेटवर्कजलालखेडा : परवानगी नसताना ताेडलेली सागाची झाडे वन विभागाने ताब्यात घेतली. ती झाडे परत करण्यासाठी तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकाने लाच स्वीकारण्यास नकार दिला व ताे लगेच पळून गेला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक (ॲन्टी करप्शन ब्युराे-एसीबी) विभागाच्या पथकाने त्याच्याविराेधात गुन्हा नाेंदविला. ही कारवाई जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाेहारीसावंगा येथे शुक्रवारी (दि. १२) करण्यात आली.

विजय भगवान मुंढे (२७) असे लाचखाेर वनरक्षकाचे नाव आहे. ताे वन विभागाच्या लाेहारीसावंगा (ता. नरखेड) येथील कार्यालयात कार्यरत आहे. त्याच्याकडे खराशी बीटची जबाबदारी साेपविली आहे. फिर्यादी भाटपुरा, काटाेल येथील रहिवासी असून, त्यांनी खराशी भागातील काही शेतकऱ्यांकडून सागासह इतर झाडे खरेदी करतात आणि ती ताेडण्यासाठी वन व महसूल विभागाने रितसर परवानगी मागतात. त्यांनी खराशी शिवारातील शेतकऱ्यांकडून सागाची झाडे खरेदी केली आणि ती ताेडली.ती झाडे विनापरवानगी ताेडल्याचे सांगून वन विभागाने ती ताब्यात घेतली. या प्रकरणात केली जाणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तसेच ताेडलेली झाडे परत करण्यासाठी विजय मुंढे याने फिर्यादीला १० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार नाेंदविली. त्याअनुषंगाने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा करीत लाेहारीसावंगा येथील कार्यालय परिसरात सापळा रचला. मात्र, संशय आल्याने विजय मुंढे याने लाच स्वीकारण्यास नकार दिला व लगेच पळून गेला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही.

या कारवाईमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विजय मुंढेच्या विराेधात जलालखेडा पाेलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ व याच अधिनियमातील संशाेधन २०१८ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. वृत्त लिहिस्ताे आराेपीस अटक करण्यात आली नव्हती. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पाेलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार व मिलिंद ताेतरे, उपअधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पाेलीस निरीक्षक दिनेश लबडे व संजीवनी थाेरात, शिपाई लक्ष्मण परतेती, अचल हरगुडे, रेखा यादव, प्रिया नेवारे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागforestजंगल