अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:09 IST2021-01-21T04:09:02+5:302021-01-21T04:09:02+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सख्ख्या बहिणी असलेल्या दाेन अल्पवयीन मुलींवर आराेपीने अत्याचार केला. ही घटना रामटेक शहरातील काछी ...

Abuse of minor girls | अल्पवयीन मुलींवर अत्याचार

अल्पवयीन मुलींवर अत्याचार

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सख्ख्या बहिणी असलेल्या दाेन अल्पवयीन मुलींवर आराेपीने अत्याचार केला. ही घटना रामटेक शहरातील काछी माेहल्ला येथे साेमवारी (दि. १८) उघडकीस आली. पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे.

धनंजय केशव खडसे (२९, रा. काछी माेहल्ला, रामटेक) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. रविवारी (दि. १७) आराेपीच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने ओळखीतील पीडित मुली त्याच्या घरी आल्या हाेत्या. आराेपीने दाेघींनाही रात्रभर मुक्काम करण्याची विनंती त्यांच्या पालकाकडे केली. पालकाने समंती दिल्यामुळे पीडित बहिणी आराेपीच्या घरी थांबल्या. दरम्यान रविवारी (दि. १७) मध्यरात्रीच्या सुमारास आराेपीने माेठ्या मुलीला तर साेमवारी (दि. १८) लहान मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. सकाळी दाेन्ही बहिणींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. लागलीच पालकांनी पाेलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नाेंदविली.

याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३), सहकलम ४ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. दरम्यान, आराेपीस न्यायालयात हजर केले असता, आराेपीची २१ जानेवारीपर्यंत पाेलीस काेठडी मिळविली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशा भुते करीत आहेत.

Web Title: Abuse of minor girls