शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

दुर्धर आजार अन् उंचीवर मात करून नागपूरच्या अबोलीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 3:33 PM

जन्मापासून किडनीचा आजार. उंची फक्त अडीच फूट. मागील वर्षी प्रकृती गंभीर झाली होती. परंतु अशा कठीण परिस्थितीतही धंतोलीच्या टिळक विद्यालयातील विद्यार्थिनी अबोली जरीत हिने ६५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.

ठळक मुद्देएक किडनी निकामी, उंचीही अडीच फुट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मापासून किडनीचा आजार. उंची फक्त अडीच फूट. मागील वर्षी प्रकृती गंभीर झाली होती. परंतु अशा कठीण परिस्थितीतही धंतोलीच्या टिळक विद्यालयातील विद्यार्थिनी अबोली जरीत हिने ६५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.अबोलीला जन्मापासून किडनीचा आजार आहे. तिची एक किडनी निकामी झाल्यामुळे तिची उंचीही अडीच फुटापेक्षा जास्त वाढली नाही. अबोली नववीपर्यंत चालू शकत होती. परंतु ती दहावीला गेली आणि तिचा आजार वाढल्यामुळे तिचे दोन्ही पाय निकामी झाले. याच काळात तिची प्रकृतीही गंभीर झाली होती. त्यातून सावरत तिने जिद्दीने कुठलीही ट्युशन न लावता घरीच अभ्यास केला. परीक्षा देण्यासाठी तिने तनुश्री टेकम आणि उज्ज्वल दिवटे यांचे लेखनिक म्हणून सहकार्य घेतले. तिला शाळेतील शिक्षिका रोहिणी अगस्ती यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व परिस्थिती विपरीत असतानाही अबोलीने बिकट परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळविले आहेत. तिने मिळविलेल्या यशामुळे तिच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर