शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

अभिजित बांगर नवे नागपूर मनपा आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:46 AM

अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान आयुक्त वीरेंद्र सिंह यांची नवी मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून प्रभारी आयुक्तांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महानगरपालिकेला अखेर बांगर यांच्या रुपात पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.

ठळक मुद्देवीरेंद्र सिंह यांची बदली : अखेर पूर्णवेळ आयुक्त मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान आयुक्त वीरेंद्र सिंह यांची नवी मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून प्रभारी आयुक्तांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महानगरपालिकेला अखेर बांगर यांच्या रुपात पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे कार्यतत्पर व कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. ते २००८ सालच्या ‘बॅच’चे अधिकारी आहेत. बांगर हे मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य बार्शी येथे होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे काही काळ तेथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ते प्राध्यापकदेखील होते. नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून कामाचा त्यांना अनुभव आहे. त्याचप्रमाणे रायगड व सातारा येथे ते प्रत्येकी दोन वर्षे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पालघरचे पहिले जिल्हाधिकारी म्हणूनदेखील त्यांनी काम केले. पालघरमधील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले होते. अमरावतीतदेखील सुमारे दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने पदभार सांभाळला.मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेतवीरेंद्र सिंह यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मनपाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. खर्चाला मर्यादा घातल्या. यावरून पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. तेव्हापासून ते शहरात राहण्यास फारसे उत्सुक नसल्याचे जाणवले. दरम्यान कौटुंबिक कारणांमुळे ते दोन महिने सुटीवर होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त असलेले रवींद्र ठाकरे यांच्याकडे मनपा आयुक्तांचा प्रभार देण्यात आला. नुकतेच वीरेंद्र सिंह नागपूरला आले होते. ते रुजू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झालेच नाही. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाबाबत बरीच चर्चा सुरु होती. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनीच नवीन बदलांबाबत संकेत दिले होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाAbhijit Bangarअभिजित बांगर