परीक्षा शुल्काविरोधात अभाविपचे ऑनलाइन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:06 IST2021-05-17T04:06:50+5:302021-05-17T04:06:50+5:30
नागपूर : कोरोनामुळे पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ...

परीक्षा शुल्काविरोधात अभाविपचे ऑनलाइन आंदोलन
नागपूर : कोरोनामुळे पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय शुल्क व उन्हाळी परीक्षांचे शुल्क घेण्यात येत आहे. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने भूमिका घेतली असून, कोरोनाची स्थिती पाहता ऑनलाइन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात महाविद्यालय शुल्क आणि विद्यापीठ उन्हाळी -२१ चे परीक्षा शुल्क घेणे अयोग्य आहे. उन्हाळी -२०२१ चे परीक्षा शुल्क माफ करावे आणि महाविद्यालयाचे शुल्क कमी करण्यात यावे, या अभाविपच्या मागण्या आहेत. विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क माफ करावे आणि महाविद्यालयाचे शुल्क कमी करावे या मागण्यांचे ई-मेल शिक्षणमंत्री व कुलगुरूंना पाठवावे. तसेच त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करावा, असे आवाहन नागपूर महानगरमंत्री करण खंडाळे यांनी केले आहे.