शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अबे, भैताडा... तर्री पोहा खातंस का; मेट्रोच्या पिलरवर रंगला नागपुरी तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:58 IST

Nagpur News मेट्रो स्टेशनचे आधुनिकपण, त्यातील कमालीची स्वच्छता, तेथील शिस्त याची चर्चा चार मंडळी जमली की होतच असते. अलीकडे या चर्चेत अजून एक मुद्दा समाविष्ट झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरात सुरू झालेली मेट्रो भलेही लोकांच्या अंगवळणी पडली नसो, त्यात एकदा बसून फिरण्याची हौस बहुतेक नागपूरकरांनी भागविली आहे. मेट्रो ही एकाअर्थाने नागपूरची शान बनली आहे. मेट्रो स्टेशनचे आधुनिकपण, त्यातील कमालीची स्वच्छता, तेथील शिस्त याची चर्चा चार मंडळी जमली की होतच असते. अलीकडे या चर्चेत अजून एक मुद्दा समाविष्ट झाला आहे.तो आहे, सदर भागातील मेट्रोच्या पिलरवर रंगविलेल्या मजकुराचा. हाव नं गा.. काऊन तं.. मले जाम टेंशन येते लेका... भैताड... बाव्वा... तर्री पोहे.. हे शब्द म्हणजे नागपूरकरांच्या पठडीतील. एका अर्थाने जगाच्या पाठीवर कुठेही गेलेला नागपूरकर या अशाच शब्दांनी ओळखला जातो. मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनला ओळख दिली जात आहे. त्यात सदरच्या स्टेशनजवळच्या पिलरवर नागपुरात बोलल्या जात असलेल्या बोली भाषेतील काही ठरावीक उद्गार व शब्द चित्रबद्ध केलेले आहेत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष तर वेधून घेतच आहेत, शिवाय ते वाचताना त्यांच्या चेहºयावर मिश्कील हसूही आणत आहेत.काय आहेत हे शब्द वा उद्गार?या पिलरवर लिहिलेल्या शब्दांमध्ये भैताड (बावळट, मूर्ख अशा अर्थाने वापरला जाणारा शब्द), काऊन बे (कशासाठी), शायनिंग मारता क्या (जास्त हुशार बनू नकोस), हाओ (होय), ब्बावा (अरे बाबा) असे खास वैदर्भीय ढंगात उच्चारले जाणारे शब्द यावर अंकित केले गेले आहेत.

टॅग्स :Metroमेट्रो