बसमधून महिलेचा मोबाईल, मंगळसुत्र पळविले
By दयानंद पाईकराव | Updated: July 15, 2023 15:37 IST2023-07-15T15:28:19+5:302023-07-15T15:37:15+5:30
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बसमधून महिलेचा मोबाईल, मंगळसुत्र पळविले
नागपूर : बसमधून महिलेचा मोबाईल आणि मंगळसुत्र असा एकुण ५५ हजाराचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
प्रज्ञा श्रीकांत लोखंडे (वय ४९, रा. अल्ट्राटेक सिमेंट, आबरपूर, चंद्रपूर) या स्नेहनगर बसस्टॉप वर्धा रोड येथून आपल्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये बसल्या. अज्ञात आरोपीने त्यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसुत्र व मोबाईल असा एकुण ५५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.