बेडवरून पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 19:30 IST2023-07-08T19:22:38+5:302023-07-08T19:30:31+5:30
Nagpur News बेडवरून पडल्यामुळे डोक्याला मार लागून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

बेडवरून पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
नागपूर : बेडवरून पडल्यामुळे डोक्याला मार लागून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आयेशा जावेद अंसारी (वय २) असे या चिमुकलीचे नाव आहे.
आयेशा बुधवारी ५ जुलैला आईसोबत झोपली होती. झोपेत असताना ती बेडवरून खाली पडली. यात तिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली. जखमी झालेल्या आयेशाला उपचारासाठी मेडिकलच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवसानंतर शनिवारी ८ जुलैला पहाटे चार वाजता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आपल्या चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या आईला जबर धक्का बसला आहे.