शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

‘या’ कारणामुळे हिंगण्यातील कारखान्यात घडले भीषण अग्नितांडव; मेडिकलमध्ये मृतांचे नातेवाईक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:13 IST

मृत-जखमींच्या नुकसानभरपाईबाबत संभ्रम

नागपूरहिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव (निपाणी) येथील कटारिया ॲग्रो प्रा. लि. च्या कारखान्यात सोमवारी झालेल्या भीषण अग्नितांडवाचे कारण समोर आले आहे. कारखान्यातील ‘इलेक्ट्रिक पॅनल’मध्ये स्फोट होऊन सर्वांत अगोदर आग लागली व आजूबाजूच्या ज्वलनशील वस्तूंमुळे वेगाने आग पसरली. मंगळवारीदेखील आग विझविण्याचे काम सुरूच होते. दरम्यान, उतरीय तपासणीनंतर तीन कामगारांचे मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आले. दरम्यान, एका मृताच्या नातेवाइकांनी या आगीची जबाबदारी कोण घेणार व नुकसानभरपाई कोण देणार, असा सवाल करत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत हेमराज आर्मो (४२, रा. वाडी), आदेश दहिवले (३३, भीमनगर झोपडपट्टी), अनुरोध मडावी (२०, सोनेगाव निपाणी) यांचा मृत्यू झाला, तर विकास मडावी (२३, रा. सोनेगाव निपाणी), सरीत मडावी (२२, सोनेगाव निपाणी) व धनेंद्र आगासे (३६, साईनगर) हे गंभीर जखमी झाले. कटारिया ॲग्रो कंपनीला सोमवारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाची मंगळवारीदेखील धडपड सुरूच होती. बाहेरून पाचारण करण्यात आलेल्या महापालिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या परत पाठविण्यात आल्या. मात्र, दोन गाड्या आणि एमआयडीसीचे कर्मचारी आग शमविण्यात व्यस्त होते. यासोबतच जेसीबी व टिप्परच्या साह्याने शेडमध्ये पडलेला लाकडी पेंढा व कच्चा माल बाहेर काढण्यात येत आहे.

प्रशासकीय लेटलतिफीत अडकला अहवाल

या अग्नितांडवातील मृत व जखमींच्या कुटुंबीयांना लगेच नुकसानभरपाईची घोषणा व्हायला हवी होती, मात्र दुसऱ्या दिवशीही प्रशासन अहवालात अडकल्याचे दिसून आले. या घटनेचा अहवाल नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांनी सोमवारी रात्रीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना पाठवला होता. एवढ्या वेदनादायी अपघातानंतर जिल्हा प्रशासन तातडीने कारवाई करून संबंधित कंपनीचालकांवर गुन्हा दाखल करून मृतांच्या नातेवाइकांना दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित एमआयडीसीकडून अहवाल मागविण्यात आला आहे. आता हा अहवाल आल्यानंतर आगीचे कारण आणि कंपनीत अशा घटनांना तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेतील त्रुटींबाबत माहिती समोर येणार आहे. त्यानंतरच जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जाऊ शकतात.

सरकारी मदतीवर प्रश्नचिन्ह

याप्रकरणी ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व निवासी उपविभागीय दंडाधिकारी विजया बनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. याबाबत नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, ही खासगी कंपनी असल्याने सध्याच्या शासकीय जीआरनुसार मृत मजुरांना शासकीय मदत देण्याबाबत संभ्रम आहे. एमआयडीसीच्या अहवालानंतरच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :fireआगAccidentअपघातDeathमृत्यूnagpurनागपूर