वरिष्ठ वकिलाला कनिष्ठ वकिलाने खुर्ची मारली, गंभीर जखमी केले
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 7, 2023 14:40 IST2023-08-07T14:40:19+5:302023-08-07T14:40:52+5:30
नागपूर जिल्हा न्यायालयातील खळबळजनक घटना

वरिष्ठ वकिलाला कनिष्ठ वकिलाने खुर्ची मारली, गंभीर जखमी केले
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय येथे सोमवारी दुपारी एका वरिष्ठ वकिलाला कनिष्ठ वकिलाने खुर्ची मारून गंभीर जखमी केले.
ऍड. वसंत उमरे, असे जखमी वकिलाचे नाव आहे. संबंधित कनिष्ठ वकील उमरे यांच्या खुर्चीवर बसला होता. त्यामुळे उमरे यांनी त्याला फटकारले. त्याचा राग आल्यामुळे कनिष्ठ वकिलाने तीच खुर्ची उचलून उमरे यांच्या डोक्यावर मारली. त्यामुळे उमरे रक्तबंबाळ झाले. इतर वकिलांनी त्यांना लगेच रुग्णालयात नेले. दरम्यान त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा न्यायालयातील वकिलांमध्ये खळबळ उडाली. ही घटना जिल्हा न्यायालय इमारतीच्या सहाव्या माळ्यावर घडली.