इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By सुमेध वाघमार | Updated: May 13, 2023 17:49 IST2023-05-13T17:49:22+5:302023-05-13T17:49:52+5:30
Nagpur News अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर आरोपी तरुणाने तिला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला.

इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
सुमेध वाघमारे
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर आरोपी तरुणाने तिला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. निखिल उर्फ आकाश विजय शर्मा (२२) असे आरोपीचे नाव आहे.
अजनी येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या १६ वर्षीय मुलीशी निखिलने इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलू लागले. गुरुवारी,११ मे रोजी रात्री १०.३० वाजता निखिलने त्या अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.