ओळखीचाच व्यक्तीच निघाला हैवान; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत केले गर्भवती
By योगेश पांडे | Updated: August 25, 2023 18:58 IST2023-08-25T18:58:00+5:302023-08-25T18:58:12+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ओळखीचाच व्यक्तीच निघाला हैवान; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत केले गर्भवती
नागपूर : ओळखीचा फायदा घेत एका तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आकाश हेमराज खोब्रागडे (२५, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी ओळखी होती. त्याचे तिच्या घरीदेखील येणेजाणे होते. त्याने तिच्या ओळखीचा फायदा घेत तिच्याशी सलगी वाढविली व १५ फेब्रुवारी २०२२ रोजी तिच्या मनाविरोधात अत्याचार केला. त्यानंतर त्याने धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केले. यामुळे विद्यार्थिनी गरोदर राहिली व तिच्या घरच्यांना हा प्रकार कळाला. त्यांनी विचारणा केली असता तिने आकाशने केलेल्या कुकृत्यांची माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आकाशविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.