गाडीवर न बसल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By योगेश पांडे | Updated: February 6, 2024 17:02 IST2024-02-06T17:02:12+5:302024-02-06T17:02:55+5:30
आशुतोष किरण टेंभुर्णे (२६, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. त्याची एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बहिणीशी ओळख होती.

गाडीवर न बसल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नागपूर : दुचाकीवर बसून घरी चलण्यास तयार न झाल्याने एका आरोपीने अल्पवयीन मुलीला मारहाण करत तिचा विनयभंग केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय.
आशुतोष किरण टेंभुर्णे (२६, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. त्याची एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बहिणीशी ओळख होती. त्यातूनच त्याने अल्पवयीन मुलीशीदेखील बोलणे सुरू केले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास तो तिला भेटायला गेला. त्यावेळी त्याने तिचा जबरदस्तीने हात पकडला व गाडीवर बसून माझ्या घरी चल असे म्हटले. मुलीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने आशुतोष संतापला व त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. मुलीने कसाबसा तेथून पळ काढला व कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.