खेळताना सर्पदंश झाला, पाच वर्षांच्या चिमुकलीने जीव गमावला
By दयानंद पाईकराव | Updated: June 8, 2024 18:30 IST2024-06-08T18:29:55+5:302024-06-08T18:30:28+5:30
Nagpur : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

A five-year-old girl lost her life after being bitten by a snake while playing
नागपूर : सर्पदंशामुळे पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हमीदनगर बुद्ध विहाराजवळ शुक्रवारी ७ जूनला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. हुम्मै कुलसुम अब्दुल तौफीक (५) असे सर्प दंशामुळे जीव गमावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हुम्मै कुलसुम आपल्या घराजवळील गल्लीत बेशुद्ध अवस्थेत पडून असलेली दिसली. तिचे आजोबा अब्दुल सलीम अब्दुल करीम (४९, रा. शांतीनगर घाटाजवळ) यांनी गल्लीत जावून पाहिले असता तिच्या गुडघ्याखाली सर्प दंश झाल्याचे दिसले. तिला उपचारासाठी शांतीनगर येथील खिदमत दवाखाना व तेथून मेयो रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. खेळता-खेळता अचानक सर्पदंश होऊन चिमुकलीने आपला जीव गमावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.