बारमालकाने दारू न दिल्याने मद्यपीचा ‘स्वर्गात’ राडा
By योगेश पांडे | Updated: May 16, 2024 15:22 IST2024-05-16T15:22:05+5:302024-05-16T15:22:38+5:30
Nagpur : बारमालकाने दारू न दिल्याने मद्यपीने बारमध्ये राडा करत चाकूने मारण्याची दिली धमकी

A drunkard fights with the bar owner because he does not serve him alcohol
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारमालकाने दारू न दिल्याने एका मद्यपीने बारमध्ये राडा करत चाकूने मारण्याची धमकी दिली. वेळेत पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मानेवाडा, बेसा मार्ग येथे अंशुल शंकरलाल हेमराजानी (३०, जरीपटका) यांचा स्वर्ग बिअर बार आहे. १५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी अनुराग विनोद दुबे (२०, शिवशक्ती नगर) हा तेथे आला. तो दारूच्या नशेत होता व त्याने आणखी दारू मागितली. अंशुलने दारू देण्यास नकार दिला. यावरून संतापलेल्या अनुरागने मला ओळखत नाही का असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अंशुलला धमकी देत तो बारच्या बाहेर आला व चाकू काढून परत अंशुलला जीवे मारण्याची धमकी दिली. अंशुलने पोलिसांना फोन करून माहिती दिली. गस्तीवरील पथक लगेच बारमध्ये पोहोचले व आरोपी अनुरागला ताब्यात घेतले. अंशुलच्या तक्रारीवरून अनुरागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.