देशी दारूचा वाद पेटला, तरूणावर दगडाने प्रहार
By योगेश पांडे | Updated: July 10, 2023 17:11 IST2023-07-10T17:11:07+5:302023-07-10T17:11:16+5:30
नागपूर : देशी दारू विकत घेताना झालेल्या वादातून दोन आरोपींनी एका तरुणावर हल्ला करत दगडाने प्रहार करत जखमी केले. ...

देशी दारूचा वाद पेटला, तरूणावर दगडाने प्रहार
नागपूर : देशी दारू विकत घेताना झालेल्या वादातून दोन आरोपींनी एका तरुणावर हल्ला करत दगडाने प्रहार करत जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सादिक सुलेमानी (३४, वाठोडा) असे जखमीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सादिक वाठोडा रिंग रोड येथील देशी दारूच्या भट्टीजवळ गेला होता. त्याच्या ओळखीतीलच शेख नासीर शेख वजीर (४२, हसनबाग) व अन्वर खान अजब खान (३३, सुभाननगर) यांच्यासोबत त्याने देशी दारूच्या दुकानात मद्यप्राशन केले. त्यानंतर परत दारू घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.
नासीर व अन्वर यांनी सादिकला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर नासीरने सादिकच्या डोक्यावर व अंगावर दगडाने प्रहार करत त्याला गंभीर जखमी केले. त्याला मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याची मानलेली बहीण सोनिया हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.