दुचाकीवर अश्लील चाळे, आणखी एका जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Updated: July 20, 2024 17:14 IST2024-07-20T17:12:21+5:302024-07-20T17:14:25+5:30
सदर पोलिसांची कारवाई : ४० सीसीटीव्ही तपासून घेतला आरोपीचा शोध

A case has been registered against another couple for obscenity on a two-wheeler
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेयसीला पुढे बसवून दुचाकीवर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपी प्रियकर व प्रेयसीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
हर्ष उर्फ बिल्ली राजेश काहर (२१, रा. चंद्रमणी चौक, वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याची २० वर्षाच्या प्रेयसीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी ११ जुलैला दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान आरोपी बिल्ली याने आपल्या प्रेयसीला दुचाकीवर समोर बसविले. त्यानंतर दुचाकीवर ते सदर परिसरात फिरून अश्लील चाळे करीत होते. सदरच्या कॅफेखोका रोडवर काही जणांनी त्यांचा व्हीडीओ तयार करून तो सोशल मिडियावर व्हायरल केला.
त्यानंतर सदर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, २९३, २९६, १२५, मोटार वाहन कायदा सहकलम ११०, ११२, ११७ नुसार गुन्हा दाखल करून तपास केला. सदर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन ठाकूर आणि पोलिसांनी परिसरातील ४० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यातील एका फुटेजमध्ये आरोपीच्या दुचाकीचा वेग कमी झाल्यामुळे दुचाकीच्या नंबर प्लेटवरील केवळ तीन अंक दिसले. परंतु पोलिसांनी शक्कल लढवून १ ते १० पर्यंत आकडे टाकून १० दुचाकीचालकांची चौकशी केली असता आरोपी बिल्ली पोलिसांच्या हाती लागला. सदर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, सी. यु-४८९४ किंमत ७० हजार रुपये जप्त केली आहे. आरोपी बिल्ली विरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात दोन घरफोडी व दोन आर्म्स अॅक्टचे गुन्हे दाखल असून एमआयडीसी ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती सदर पोलिसांनी दिली.