नागपुरात जोड्यांच्या बॉक्समध्ये आढळली बॉम्बसदृश्य वस्तू
By योगेश पांडे | Updated: October 23, 2024 15:08 IST2024-10-23T15:07:14+5:302024-10-23T15:08:26+5:30
Nagpur : बॉम्बशोधक पथकाकडून बॉक्स उघडून त्यातील वायरिंगची तपासणी सुरू

A bomb-like object found in a shoes' box in Nagpur
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील हिंगणा परिसरात रहिवाशी वस्तीमध्ये जोड्यांच्या बॉक्समध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक, बॉम्बस्क्वॉड घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संबंधित बॉक्सला निर्जन स्थळी नेत त्याची चाचपणी सुरू आहे.
हिंगणा मार्गावरील पार्लेकर ले आऊट परिसरात हा बॉक्स आढळला. तेथील रहिवासी भागात एका घराजवळ हा बॉक्स पडला होता. नागरिकांनी लगेच याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले व तातडीने बॉम्बशोधक पथकालादेखील बोलविण्यात आले. बॉम्बशोधक पथकातील कर्मचाऱ्यांनी तो बॉक्स सुरक्षितपणे उचलून पोलिसांच्या गाडीत ठेवला व तेथून तो वानाडोंगरीतील मोकळ्या मैदानात नेण्यात आला. पोलिसांच्या प्रोटोकॉलननुसार आता पथकाकडून तो बॉक्स उघडून त्यातील वायरिंगची तपासणी सुरू असून त्यात विस्फोटक आढळले तर तिथेच त्यांना ‘डिफ्युज’ करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त लोहीत मतानी यांनी दिली.