नैराश्यातून घरातील देवघरात २० वर्षीय तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 20:50 IST2022-09-16T20:50:26+5:302022-09-16T20:50:59+5:30
Nagpur News नैराश्यातून इमामवाड्यातील सिरसपेठ येथे २० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. रोमित सुनील साकोडे असे तरुणाचे नाव असून, दहावीनंतर त्याने शिक्षण सोडले होते.

नैराश्यातून घरातील देवघरात २० वर्षीय तरुणाची आत्महत्या
नागपूर : नैराश्यातून इमामवाड्यातील सिरसपेठ येथे २० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. रोमित सुनील साकोडे असे तरुणाचे नाव असून, दहावीनंतर त्याने शिक्षण सोडले होते. मागील काही दिवसांपासून त्याला व्यसनदेखील लागले होते व त्यातून तो नैराश्यात होता.
रोमितच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले तर आई टिफिन सेवा चालवते. त्याला एक लहान बहीणही आहे. सकाळी १० वाजता आई कामानिमित्त बाहेर गेली व बहीण शिकवणीसाठी गेली. यानंतर रोमितने देवघरातील पंख्याला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. साडेअकराच्या सुमारास आई घरी परतल्यावर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. रोमितला प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.