विजेच्या तारेवर पडलेला शर्ट काढायला गेला अन् १३ वर्षांच्या मुलाने जीव गमावला
By योगेश पांडे | Updated: May 9, 2023 17:12 IST2023-05-09T17:10:32+5:302023-05-09T17:12:25+5:30
Nagpur News घरासमोरील वीजेच्या वायरचा शॉक लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विजेच्या तारेवर पडलेला शर्ट काढायला गेला अन् १३ वर्षांच्या मुलाने जीव गमावला
योगेश पांडे
नागपूर : घरासमोरील वीजेच्या वायरचा शॉक लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गौरव पप्पू यादव (१३, तुकाराम नगर) असे मृतक मुलाचे नाव आहे. तो त्याच्या कुटुंबियांसह एका घरी दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. घरासमोरील वीजेची वायर जात होती व नेमका त्याच्यावर वाळवायला टाकलेला शर्ट पडला. ते गौरवला दिसले व त्याने एका रॉडला लाकडी काडी बांधून तो कपडा काढण्याचा प्रयत्न सुरू केला. नेमका रॉडचा स्पर्श विजेच्या तारांना झाला व त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. तो खाली पडला व बेशुद्ध झाला. आवाज झाल्याने त्याचे कुटुंबिय व परिसरातील नागरिक धावले. त्याला खाजगी इस्पितळात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याची आई गायत्री यांच्या सूचनेवरून कळमना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक माटे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गौरवच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.