लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी एकूण ३०२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता निवडणुकीच्या नागपूर महापालिका रिंगणात ९९२ उमेदवार असून, प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी केवळ १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र, शेवटच्या दिवशी तब्बल २९० उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज अनेक माजी नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती. यात भाजप व काही काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश होता.
झोननिहाय आकडेवारी पाहता लकडगंज झोनमध्ये सर्वाधिक ४३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर मंगळवारी झोनमध्ये ३७, सतरंजीपुरा झोनमध्ये ३५, तर धंतोली आणि नेहरूनगर झोनमध्ये प्रत्येकी ३३ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
गांधीबाग महाल झोनमध्ये ३०, हनुमानगर झोनमध्ये २८, आसीनगर झोनमध्ये २७, धरमपेठ झोनमध्ये २४, तर लक्ष्मीनगर झोनमध्ये १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या अनेक प्रभागांतील उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी माघारीमुळे झाली आहे.
झोननिहाय वैध उमेदवारी व माघार घेतलेले
लक्ष्मीनगर ७५ १२धरमपेठ १०७ २४हनुमाननगर ११३ २८धंतोली १२२ ३३नेहरूनगर १४४ ३३गांधीबाग १३९ ३८सतरंजीपुरा १२४ ३५लकडगंज १३७ ४३आसीनगर १८० २७मंगळवारी १५३ ३७एकूण १२९४ ३०२
अर्ज मागे घेतल्यानंतर अनेक प्रभागांतील लढती आता थेट आणि अधिक चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काही प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सरळ सामना रंगणार आहे. काही प्रभागांत अपक्ष उमेदवारामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. त्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारात अधिक ताकद लावावी लागणार आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर १२९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ८० उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. झोननिहाय उमेदवारसंख्येत मोठी तफावत दिसून येत आहे. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक १८० उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यामध्ये ९२ महिला उमेदवार आहेत. तर लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वात कमी ७५ उमेदवार रिंगणात आहेत, त्यात ३४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. अंतिम उमेदवारांची यादी निश्चित झाल्याने आता प्रचाराला वेग येणार असून, नागपूर महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Web Summary : Nagpur municipal elections see 992 candidates after 302 withdrawals. Some wards will witness straight fights, while independents add excitement, demanding robust campaigns.
Web Summary : नागपुर नगर निगम चुनाव में 302 उम्मीदवारों की वापसी के बाद 992 उम्मीदवार मैदान में हैं। कुछ वार्डों में सीधा मुकाबला होगा, जबकि निर्दलीय उत्साह बढ़ाएंगे, जिसके लिए मजबूत अभियान की आवश्यकता है।