शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:50 IST

Nagpur Crime news : नागपूरमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पाच वर्षाच्या छोट्या बहिणीसोबत घरात असलेल्या ९ वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केला. याबद्दल कुणालाही न सांगण्यासाठी त्याने २० रुपये दिले. 

Nagpur News : आईवडील कामावर गेलेले असताना छोट्या बहिणीसह घरात असलेल्या एका ९ वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडितेच्या छोट्या बहिणीसमोर ही घटना घडली. आईवडील कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेबद्दल कुणालाही न सांगण्यासाठी आरोपीने पीडितेला २० रुपये दिले होते. पोलिसांनी मुलींनी वर्णन केल्याप्रमाणे रेखाचित्र तयार केले असून, आरोपीचा शोध घेत आहेत. 

९ वर्षाच्या मुलीवर घरात घुसून अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने नागपूर हादरले. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजता शहरातील पारडी भागात घडली. मुलीचे आईवडील मजुरी करतात. तर दोन्ही मुली घरीच राहत होत्या. ते कामावर गेलेले असताना आरोपी घरी आला होता. 

घरात घुसला अन् अत्याचार केला

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत घरात होती. त्यावेळी एक ३५-४० वर्ष वय असलेला आरोपी दुचाकीवरून घरी आला. त्यांनी बाहेरून आवाज दिला आणि वडिलांबद्दल चौकशी केली. वडिलांच्या नावाने आवाज दिला. 

घरात दोन्ही मुलीच असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी घरात घुसला. त्यानंतर त्याने ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या छोट्या बहिणीसमोरच अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबद्दल कुणालाही काहीही न सांगण्यासाठी पीडितेला २० रुपये दिले आणि फरार झाला. 

मुलीने आईवडिलांना सांगितली घटना

आईवडील कामावरून घरी परतल्यानंतर दोन्ही मुलींनी झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलीसह पारडी पोलीस ठाण्यात जाऊन याची तक्रार केली. वैद्यकीय चाचणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे आढळून आले. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या सांगण्यावरून एक रेखाचित्र तयार करण्यात आले असून, आरोपींचा शोध घेत आहे.