शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

८५ वर्षांच्या भोपत यांचे नामांकन दाखल

By admin | Updated: November 9, 2014 00:47 IST

लोकशाहीत १८ वर्षानंतर कोणत्याही वयात निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा लाभ घेत आकोली येथील वृद्ध दाम्पत्याने ग्रामपंचायतीकरिता उमेदवारी दाखल केली.

ग्रामपंचायतीची निवडणूक : वॉर्ड क्रमांक ३ मध्ये वयोवृद्ध दाम्पत्य रिंगणातअरविंद काकडे ल्ल आकोली (वर्धा)लोकशाहीत १८ वर्षानंतर कोणत्याही वयात निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा लाभ घेत आकोली येथील वृद्ध दाम्पत्याने ग्रामपंचायतीकरिता उमेदवारी दाखल केली. ८५ वर्षांचा पती व ८० वर्षांची पत्नी या दोघांच्या नामांकनाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे. या दाम्पत्याचे नाव भोपत सावळे (८५) व सुभद्रा भोपत सावळे (८०) असे आहे. सेलू तालुक्यातील आकोली ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच चर्चेत आली आहे. तीन वॉर्डात विभागल्या गेलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. सरपंचपद अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणताच गावात अनेकजण बाशिंग बांधून असतात. याकरिता अनेकांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी शनिवारी येथील भोपत रामचंद्र सावळे (८५) व सुभद्रा भोपत सावळे (८०) हे दोघे त्यांचे युवा समर्थक राहुल दरणे, अमोल गुडधे व इतर सहकाऱ्यांसह सेलूच्या तहसील कार्यालयात अ‍ॅटोने दाखल झाले. वृद्ध दाम्पत्य असल्याने काहींनी त्यांना आज सुटी असल्याने निराधाराचे कार्यालय बंद आहे, आज सोमवारी या असे सांगितले. यावर उत्तर देत या दोघांनीही आम्ही निराधारांचा लाभ घेण्याकरिता नाही तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहायला आलो. यावर उपस्थितीतात चांगलाच हशा पिकला. लागलीच या वृद्ध दांम्पत्याने एकमेकाला आधार देत निवडणूक अधिकाऱ्यापुढे हजर होऊन जोडीने उमेदवारी अर्ज सादर केला. वॉर्ड क्र. तीन मधून पतीने सर्वसाधारण तर पत्नीने महिलांच्या सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज सादर केला.