शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नागपुरात कॅरेज अँड वॅगनच्या ८० कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 10:11 PM

कंत्राटदाराकडून होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शुक्रवारी कॅरेज अँड वॅगन विभागातील जवळपास ८० महिला आणि पुरुष कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सर्व कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. अखेर सायंकाळी कंत्राटदाराने १०० रुपये वेतन अधिक देण्याचे मान्य केल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देकंत्राटदाराकडून पिळवणूक : रेल्वेगाड्यांच्या सफाईवर झाला परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंत्राटदाराकडून होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शुक्रवारी कॅरेज अँड वॅगन विभागातील जवळपास ८० महिला आणि पुरुष कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सर्व कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. अखेर सायंकाळी कंत्राटदाराने १०० रुपये वेतन अधिक देण्याचे मान्य केल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.नागपूर रेल्वेस्थानकावर कॅरेंज अँड वॅगन विभागात पीयूष ट्रेडर्सला रेल्वेगाड्यांच्या सफाईचे काम देण्यात आले आहे. हे काम करणाऱ्या कामगारांनी अनेकदा नियमानुसार वेतन देण्याची मागणी केली. परंतु कंत्राटदाराने सातत्याने कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. कामगारांच्या वेतनातून मागील दीड वर्षांपासून पीएफचे पैसे कापण्यात येत आहेत. परंतु केवळ दोन महिन्यांचे पैसे जमा झाल्याचे खात्यात दिसत आहे. याशिवाय कामगारांना साप्ताहिक सुटी देण्याची मागणीही कंत्राटदाराने पूर्ण केली नाही. त्यासाठी कामगारांनी १ एप्रिलला विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना नोटीस देऊन काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी जवळपास ८० कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. सकाळपासून कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. कामगारांनी काम बंद केल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांकडून रेल्वेगाड्या सफाईचे काम करून घेतले. सायंकाळी संबंधित कंत्राटदाराने १०० रुपये अधिक वेतन देण्याचे जाहीर केल्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब घरडे यांनी केले. यावेळी अस्मिता साखरे, चेतना घोडेस्वार, रत्नमाला चनोडे, गीता कोकासे, निता सहारे, चंद्रकला फटिंग, उषा चहांदे, मंदा चवरे, प्रतिमा चवरे, निर्मला सातपुते, संगीता पेलने, अनिता डहाके, छाया प्रजापती, राजू बावनकर यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीStrikeसंप