शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

८० टक्के पारधी मुलांनी शाळाच पाहिली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:01 PM

आॅनलाईन लोकमतनागपूर : गावकुसाबाहेर तांड्यावर, पाड्यावर राहून भटकंती करणाऱ्या  पारधी समाजाचे विदारक चित्र पुरोगामी महाराष्ट्रावर कलंक म्हणावा असेच आहे. प्राथमिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या पारधी समाजातील ८० टक्के मुलांनी कधी शाळेचे तोंडच पाहिले नाही. सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या  समता आंदोलन या संस्थेने विदर्भातील पारधी समाजाच्या परिस्थितीवर केलेल्या सर्वेक्षणात हे धक्कादायक ...

ठळक मुद्देविदर्भातील सर्वेक्षणात धक्कादायक खुलासेसमता आंदोलनाची पाहणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : गावकुसाबाहेर तांड्यावर, पाड्यावर राहून भटकंती करणाऱ्या  पारधी समाजाचे विदारक चित्र पुरोगामी महाराष्ट्रावर कलंक म्हणावा असेच आहे. प्राथमिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या पारधी समाजातील ८० टक्के मुलांनी कधी शाळेचे तोंडच पाहिले नाही. सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या  समता आंदोलन या संस्थेने विदर्भातील पारधी समाजाच्या परिस्थितीवर केलेल्या सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.विकसित म्हणविणाऱ्या  महाराष्ट्रात  वंचित समाजाच्या उत्थानासाठी अनेक योजना राबविण्याचा गवगवा सर्वच सरकारांकडून केला जातो. मात्र हा विकास प्रत्यक्ष त्या समाजापर्यंत पोहोचला का, याकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही. भंडारा जिल्ह्यात गावकऱ्यांकडून गावाबाहेर राहून शेतीची कामे करणाऱ्या  पारध्यांची संपूर्ण वस्ती जाळून टाकली जाते, एक मुलीने शेतातून वांगी तोडली म्हणून तिच्यासह संपूर्ण कुटुंबावर अत्याचार केले जातात, तेव्हा पारधी समाजाबाबत असलेली घृणा समजण्यास उशीर लागत नाही. पारधी समाजाचे सत्य वास्तव शासनासमोर मांडण्यासाठी समता आंदोलनाने विदर्भातील ५ जिल्ह्यांच्या ४० गावांमध्ये ५०० कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे. या अहवालाची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आणि विचार करायला लावणारी आहे. समता आंदोलनाचे कौस्तुभ पांढरीपांडे यांनी या सर्वेक्षणाचे विदारक चित्र माध्यमांसमोर मांडले. पारधी समाजातील ६९ टक्के लोकांकडे जातीचे दाखलेच नाहीत. तब्बल ७० टक्के लोकांकडे रेशनचे कार्ड नाही. देशात मतदान हा मूलभूत हक्क म्हणून संविधानाने मान्यता दिली आहे. मात्र पाच जिल्ह्यातील ५६ टक्के नागरिकांकडे हा हक्क बजावण्यासाठी मतदान कार्ड नाही व मतदार यादीत नावही नाही. भिक्षा मागूनच पोट भरणाऱ्या  या समाजातील ८३ टक्के लोकांचे दारिद्र्य रेषेच्या यादीत नावच नाही. देशात आधार कार्ड देण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा राबविणारे शासन पारधी समाजाला मूलभूत दस्तऐवज देण्यास कमी पडते, यापेक्षा दुसरे आश्चर्य ते काय? सर्वेक्षणातील इतर गोष्टी या गंभीरतेने विचार करायला लावणाऱ्या  आहेत. पारधी समाजातील ७२ टक्के लोक असे आहेत, ज्यांच्याकडे एक तर घर नाही किंवा झोपडी किंवा कुडाच्या घरात राहणे भाग पडते. शिक्षणाची आकडेवारीही कमी धक्कादायक नाही. ७९ टक्के मुले शाळेतच गेली नाही आणि जी २१ टक्के शाळेत गेली त्यातील ६० टक्के मुलांनी मॅट्रिकच्या आधीच शाळा सोडून दिली आहे.आरोग्य सुविधांबाबत अनेक प्रकारची हेळसांड या समाजाला सहन करावी लागते. हे चित्र बदलण्यासाठी शासनाने गंभीरतेने पावले उचलण्याची गरज असल्याची भावना पांढरीपांडे यांनी व्यक्त केली. समता आंदोलनाच्या अलका माटे, बाळासाहेब रणपिसे यांनी हा सर्वेक्षण अहवाल माध्यमांसमोर ठेवला. आजपासून धरणे आंदोलनपारधी समाजाला जातीचे दाखले मिळावेत, त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा, पारधी समाजाचा विकास आराखडा तयार करावा, हिंगोली येथील कुटुंबावर झालेल्या अत्याचाराची चौकशी करण्यात यावी, नितीन आगे खून प्रकरणाचा तपास नव्याने करावा आदी मागण्यांसाठी १४ डिसेंबरपासून पटवर्धन मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरातून ५०० च्यावर समाजबांधव यामध्ये सहभागी होणार असल्याचे कौस्तुभ पांढरीपांडे यांनी सांगितले. अंधारात आशेचा किरणया विदारक परिस्थितीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी संघटनेतर्फे तरुणांना शिक्षित करण्यावर भर दिला जात आहे. अकोला जिल्ह्यातील वडाळा हे गाव याबाबत प्रेरणादायी ठरले आहे. या गावातील साहेबराव राठोड आणि कुलदीप राठोड यांनी गावातील बदलत्या परिस्थितीची माहिती दिली. गावात जात पंचायतीऐवजी तांडा पंचायतीने काम केले जाते. यानुसार मुलांच्या शिक्षणासाठी, सामाजिक योजनांबाबत जनजागृतीसाठी तरुणांनी अभियान छेडले आहे. त्यामुळेच पारधीबहुल असलेल्या या गावाला पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूर