शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:39 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल

नागपूर - मी शेतकऱ्याचं पोरगं असून शेतकऱ्यांसोबतच राहणार. मी इकडचाही नाही अन् तिकडचाही नाही. आम्ही दिल्लीकरांपुढे शेपूट हलवत नाही, इथूनच दिल्लीवाल्यांना शेपूट हलवायला लावतो, असे म्हणत भाजपा नेत्यांवर आमदार बच्चू कडूंनी प्रहार केला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, स्वामिनाथन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी बच्चू कडूंनी विधानसभेतील भाषणात केली. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. आज जरी कर्जमाफी केली तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही. उद्या त्याच्या 7/12 वर कर्ज येणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघंय, असे म्हणत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना मुद्दा लावून धरला. मी सरकारला पाठिंबा दिला असेल, पण आपण शेतकऱ्यांसोबत बेईमानी करत आहोत. मीसुद्धा बेईमानीच करतोय. 7 व्या वेतन आयोगासाठी कुणाला मोर्चे किंवा आंदोलन करावे लागले का? 7 वा वेतन आयोग आपण फटकीनं देऊन टाकला. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईही मिळाली नाही. 

पीएम किसान योजना अद्यापही 25 टक्के लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. कारण, प्रशासन नालायक आहे. इथं लष्काराचं राज्य पाहिजे, तेव्हा अधिकारी सरळ होतील. आम्हीच अधिकाऱ्यांचे लाड पुरवतोय. शेतकऱ्याची 5 लाखांची शेती गहाण ठेऊन केवळ 20 हजारांचं कर्ज दिलं जातंय. आता, ठाकरे सरकार आहे. शेतकऱ्यांनी ठाकुरकी केली पाहिजे. हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे कर्ज मागायला येणार नाही. अतिवृष्ट झाली, पाण्याखाली शेती गेली पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाला नाही. पिकविम्याच पैसै शेतकऱ्यांना तातडीने भेटणं गरजेचं आहे. केवळ 7 मंत्र्यांचं जरी सरकार असलं तरी, पिकविम्याचे पैसे 15 दिवसांत शेतकऱ्याला कसे भेटतील, हे प्रयत्न नक्की करू. शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची गरज होती. उद्धव ठाकरे हे शिवभक्त आहेत, ते हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत नक्कीच देतील हा मला आत्मविश्वास आहे, असे म्हणत शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत मिळेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय. 

आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तर जयंत पाटील यांनीही राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटले. शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFarmerशेतकरी