७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:42+5:302021-04-09T04:08:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कन्हान : पोलिसांनी घाटराेहणा (ता. पारशिवनी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये काेळशाची चाेरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ...

७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पोलिसांनी घाटराेहणा (ता. पारशिवनी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये काेळशाची चाेरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात आराेपी ट्रकचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.६) मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
भैयालाल बच्चा सूर्यवंशी (४६, रा. वाॅर्ड नं. ४, वलनी, खापरखेडा) असे अटकेतील आराेपी ट्रकचालकाचे नाव आहे. कन्हान पाेलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना, गाेंडेगाव खाणीतून काेळशाची चाेरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना त्यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी वेकाेली गाेंडेगाव खाणीतील गार्ड मेहुल प्रभाकर लेंडे, रा. बहादुरा, नागपूर यांच्यासह सापळा रचून एमएच-३४/एम-४७११ क्रमांकाच्या ट्रकला घाटराेहणा शिवारातील एचओई डम्पिंगच्या मागे अडवून ट्रकचालकास ताब्यात घेतले. सदर ट्रकमध्ये कुंदन तिजारे रा. कांद्री, कन्हान याच्या सांगण्यावरून भरला असल्याचे ट्रकचालकाने पाेलिसांना सांगितले. ट्रकमधील १० काेळसा किंमत ५० हजार रुपये आणि ७ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपी ट्रकचालकास अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे करीत आहेत.