सात दिवसांचे अधिवेशनात ७२.३५ तासांचे कामकाज ! १६ विधेयके करण्यात आले मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:02 IST2025-12-15T16:57:27+5:302025-12-15T17:02:29+5:30
Nagpur : अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू झाले. रविवारी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी कामकाजाचा आढावा घेताना सांगितले की, सात दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण ७२.३५ तास कामकाज झाले.

72.35 hours of work in the seven-day session! 16 bills were passed
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू झाले. रविवारी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी कामकाजाचा आढावा घेताना सांगितले की, सात दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण ७२.३५ तास कामकाज झाले. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी केवळ १० मिनिटांचा वेळ वाया गेला असून, दररोज सरासरी १०.२२ तास सभागृहात कामकाज झाले.
सरकारतर्फे मंजुरीसाठी १८ विधेयके सभागृहात मांडण्यात आली होती. त्यापैकी १६ विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच विधानपरिषदेतून मंजूर झालेल्या ४ विधेयकांना मान्यता देण्यात आली. गैरसरकारी २१ विधेयके सादर झाली, त्यापैकी ८ विधेयके मंजूर करण्यात आली. एकूण १२ शोक प्रस्ताव मांडण्यात आले. प्राप्त झालेल्या ७,२८६ तारांकित प्रश्नांपैकी २१५ प्रश्नांना मान्यता देण्यात आली. २७ प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली. १,८६८ लक्षवेधीतून २९९ सूचना मंजूर झाली.
नियम २७ अंतर्गत २७ प्रस्ताव प्राप्त झाले. मात्र, त्यापैकी एकावरही चर्चा होऊ शकली नाही. तर नियम २९३ अंतर्गत आलेल्या २ प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यावर सभागृहात चर्चा झाली. सभागृहात सदस्यांनी 'वंदे मातरम्' या गीताचे सामूहिक गायन केले. सदस्यांची कमाल उपस्थिती ९०.८० टक्के, तर किमान उपस्थिती ४३.८५ टक्के होती. अशा प्रकारे सरासरी ७५.९४ टक्के सदस्य दररोज हिवाळी अधिवेशनात सभागृहात उपस्थित होते.