नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ६९५ बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:32 IST2020-12-20T00:31:13+5:302020-12-20T00:32:18+5:30
Liquor seized at Nagpur railway station , crime news रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी पहाटे ४.१० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२५११ गोरखपूर-त्रिवेंद्रम मधून दारूच्या ५९०७५ रुपये किमतीच्या ६९५ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ६९५ बॉटल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी पहाटे ४.१० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२५११ गोरखपूर-त्रिवेंद्रम मधून दारूच्या ५९०७५ रुपये किमतीच्या ६९५ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक सचिन दलाल, कामसिंग ठाकूर, राजेश खोब्रागडे, शीतल नगर हे पहाटे ४.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना रेल्वेगाडी क्रमांक ०२५११ गोरखपूर-त्रिवेंद्रम विशेष रेल्वेगाडीत तीन बेवारस बॅग आढळल्या. बॅगबाबत त्यांनी आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यानंतर या बॅग आरपीएफ ठाण्यात आणून पंचासमक्ष उघडल्या असता त्यात ९० मिलिलिटर दारूच्या ६९५ बॉटल आढळल्या. पकडण्यात आलेल्या दारूची किंमत ५९०७५ रुपये आहे. कागदोपत्री कारवाईनंतर ही दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.