शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

नागपूर शहरात आढळले डेंग्यूचे ६९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 1:34 AM

नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिके च्या दहा झोनच्या कार्यक्षेत्रात ९२१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील २६५ रुग्णालय आणि ९५ प्रयोगशाळांतून ही माहिती प्राप्त झाली आहे. गुरुवारी महापालिक मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्दे९२१ संशयित रुग्ण : आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिके च्या दहा झोनच्या कार्यक्षेत्रात ९२१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील २६५ रुग्णालय आणि ९५ प्रयोगशाळांतून ही माहिती प्राप्त झाली आहे. गुरुवारी महापालिक मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.डेंग्यूची लागण झाल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत आहेत. नगरसेवक याबाबत अधिकाºयांना जी माहिती देतात, त्यावर तातडीने उपाययोजना अधिकाऱ्यांनी करावी. संपूर्ण शहरभर सातत्याने फवारणी, र्फाॅगिंग करावे. डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी बैठकीत दिले. मात्र आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने निर्देशाचे पालन कसे करावे, असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकाºयांना पडला आहे.यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेवक सुनील अग्रवाल, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे आणि झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.प्रत्येक झोनमध्ये आरोग्य विभागात किती कर्मचारी आहेत, फवारणी दररोज होते की नाही, आतापर्यंत किती फवारणी केली, डेंग्यूची निर्मिती करणाºया अळ्या आहेत का, यासाठी किती घरांची तपासणी केली, किती घरांना भेटी दिल्या याबाबतचा झोननिहाय आढावा महापौरांनी घेतला.दरम्यान, बाभूळवन येथील दौरा केला असता तेथे पाण्याच्या टाकीचे ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे आढळून आले. परिसरातील एका औषध कंपनीमुळे तेथील नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो आहे. रहिवासी क्षेत्रात अशी कंपनी कशी असू शकते, असा सवाल करीत तातडीने त्याचा अहवाल सादर करा, असेही निर्देश महापौरांनी दिलेपॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चमूने तपासणी केली. घरांची पाहणी करून त्या घरात आणि परिसरात पुन्हा डेंग्यू (लारवी) अळीची पैदास होणार नाही यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली.कर्मचाऱ्यांची कमतरतामहापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणाच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती पुढे आली आहे. महापौरांनी याचा आढावा घेऊन आवश्यक कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्याची नावे वृत्तपत्रात द्याडेंग्यूचा प्रकोप होऊ नये, यासाठी मनपातर्फे वेळोवेळी जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येतात. मात्र, तरीही नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. आता मनपाच्या तपासणी मोहिमेत ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींची नावेच वर्तमानपत्रात प्रकाशित करा, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी केली.स्थायी समितीच्या बैठकीतही चर्चाशहरात डेंग्यूचा वाढता प्रकोप विचारात घेता स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. डेंग्यूला आळा घालण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. तसेच जनजागृतीसाठी मराठी भाषेसोबचत हिंदी व उर्दू भाषेतही पत्रक प्रसिद्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdengueडेंग्यू