शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नागपुरातील मानेवाड्यात ६.५५ लाखाची बनावट दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:24 PM

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ब्रॅण्डेड कंपनीची बनावट दारू, लेबल, झाकणांसह ६.५५ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देदोघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ब्रॅण्डेड कंपनीची बनावट दारू, लेबल, झाकणांसह ६.५५ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला. तसेच दोन इसमांना अटक करण्यात आली. ही नकली दारू ड्राय डेच्या दिवशी शहरातील अवैध दारू विक्रीशी जुळलेल्या लोकांच्या माध्यमातून विकली जात असल्याची माहिती आहे.नकली दारूशी संबंधित आरोपीमध्ये आकाशनगर येथील अजय अशोक शेंडे आणि त्याचा साळा आशिष दरोटे याचा समवेश आहे.ड्राय डे च्या दिवशी मानेवाडा येथून मोठ्या प्रमाणावर वर्धा आणि चंद्रपूर येथे नकली दारू जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. ‘ब’ विभागाचे निरीक्षक प्रशांत गोतमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत मानेवाडा रिंग रोड परिसरात पाळत ठेवून अजय अशोकराव शेंडे यास हिरो अ‍ॅक्टिव्हा क्र. एमएच. ४९ एएम ३९९० व बनावट मद्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्या आकाशनगर येथील घरातून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांची झाकणे व लेबल जप्त करण्यात आले. याशिवाय अजय शेंडेचा मेहुणा आशिष माणिकराव दरोटे याच्या अजनी परिसरातील घरातून बनावट विदेशी मद्यसाठ्यासह वाहतुकीकरिता वापरण्यात येणारे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १८० मिलीच्या १४३४ बनावट मद्याच्या बाटल्या (३० पेटी) , १५०० बनावट झाकणे व लेबल, बनावट विदेशी दारु बॉटलींगचे साहित्य असा एकूण ६ लाख ५५ हजार ४७२ रुपयाच्या मुद्देमालासह वरील दोघांना अटक करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक स्वाती काकडे व उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रशांत गोतमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंदू दरोडे, जवान धवल तिजारे, विनोद डुंबरे, सुधीर मानकर, रेश्मा मते, समीर सईद व शिरीष देशमुख यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. 

टॅग्स :nagpurनागपूरliquor banदारूबंदी