शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याच्या ६,५०० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:43 IST

शहरालगतच्या भागातच नाही तर मध्यवर्ती भागातही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही.

आरोग्य धोक्यात : अधिकारी -पदाधिकारी फोन उचलेनातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरालगतच्या भागातच नाही तर मध्यवर्ती भागातही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही. मागील काही महिन्यात दूषित पाण्याच्या तब्बल ६,५०० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी देण्यात आली. सीमावर्ती भागातील वस्त्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबतचा प्रश्न प्रफुल्ल गुडधे व रमेश पुणेकर यांनी उपस्थित केला होता. या संदर्भात तक्रार करण्यासाठी महापौर व पदाधिकाऱ्यांना फोन केला पण प्रतिसाद मिळत नाही. उपमहापौरांच्या प्रभाग २० मधील वस्त्यांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणले. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विविध आजार होत असल्याचे विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी निदर्शनास आणले. दूषित पाण्याची तपासणी करण्यासाठी महापालिके ची यंत्रणा आहे का, यावर काय उपाययोजना करण्यात आल्या असा प्रश्न प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला. उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी निदर्शनास आणले. दूषित पाण्याची समस्या काही ठराविक वस्त्यात आहेत.तक्रारी असलेल्या भागाची कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करण्याची सूचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केली. दूषित पाण्याच्या बहुसंख्य तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.गायकवाड यांनी दिली.