शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

६२५ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: July 26, 2015 03:15 IST

जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

६७,५५४ शेतकऱ्यांना पुरवठा : पालकमंत्र्यांकडून बँकांचे अभिनंदन नागपूर : जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ८४१.५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून ही प्रक्रिया २२ जुलै पर्यंतची असून ७४.२८ ही पीककर्ज वाटपाची यंदाची टक्केवारी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. रविभवन येथे पार पडलेल्या या बैठकीत आमदार सुधीर परवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षी खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात महत्त्वाची भूमिका बजावल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाच्यावतीने सर्व बँकांचे अभिनंदन केले. तसेच यंदा पावसाने सुरुवातीला दमदार सुरुवात केल्यानंतर जुलैच्या मध्यात दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल, अशी भीती होती.परंतु पावसाच्या पुनरागमनाने ती भीती संपली असून राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यांवर होणाऱ्या एकूण खर्चात ४० टक्के कपात झाली असल्याचे यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात पिकाखालील एकूण क्षेत्र पाहता खताचा ५० हजार मेट्रिक टन असा मुबलक साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खत पुरवठ्याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यंदाचा खरीप हंगाम-२०१५ चा पीक पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल पाहता नागपूर जिल्ह्यात ११३८.८६ मि.मि. इतका सरासरी पाऊस असून २४ जुलै पर्यंत प्रत्यक्ष ४१७.५ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या तुलनेच ३६.६५ टक्के पाऊस झाला आहे.(प्रतिनिधी)दुबार पेरणीचे संकट दूर जिल्ह्यातील खरीप हंगामात आतापर्यंत पीक पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या प्रमाणात ८१.७० टक्के इतकी लागवड झाली आहे. यात २२ जुलैपर्यंत कापूस २ लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. ही लागवड ९८.६९ टक्के इतकी आहे. सोयाबीन १ लाख २४ हजार ४०६ हेक्टर (८६ टक्के), भात १२ हजार १६८ हेक्टर (४ टक्के) आणि तूर ४८ हजार ५८९ हेक्टर (१०६ टक्के) इतकी लागवड झाली आहे जिल्ह्यात वेळेवर पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट दूर झाल्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.