कुरिअर बॉयच्या घरातून ४.९७ लाखांचा मुद्देमाल पळविला
By दयानंद पाईकराव | Updated: April 29, 2023 16:26 IST2023-04-29T16:22:16+5:302023-04-29T16:26:22+5:30
ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० दरम्यान घडली.

कुरिअर बॉयच्या घरातून ४.९७ लाखांचा मुद्देमाल पळविला
नागपूर : घराला कुलूप लाऊन कुरीअरच्या कामासाठी गेलेल्या युवकाच्या घरातून अज्ञात आरोपीने ४.९७ लाखाचा मुद्देमाल पळविला. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० दरम्यान घडली.
रिना सुधीर ठाकुर (४१, योगेश्वरनगर, साखरकर ले आऊट) यांचा मुलगा घराला कुलुप लाऊन कुरीअरच्या कामावर गेला होता. दरम्यान अज्ञात आरोपीने त्याच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून सुटकेसमधील सोन्याचे दागीने, बांगड्या, मंगळसुत्र, बकुळी हार, अंगठी, चैन व रोख ६५ हजार रुपये असा एकुण ४.९७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
रिना ठाकुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.