शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

४.७५ कोटीचे गॅस सिलेंडर वाटलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:49 AM

शालेय पोषण आहार अभियानांतर्गत शाळांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यासाठी ४.७५ कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. २०१२-१३ या वर्षात मिळालेला हा निधी खर्चच झाला नाही. या योजनेचा निधी पडून आहे, हे प्रशासनाला माहीत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय पोषण आहार अभियानांतर्गत शाळांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यासाठी ४.७५ कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. २०१२-१३ या वर्षात मिळालेला हा निधी खर्चच झाला नाही. या योजनेचा निधी पडून आहे, हे प्रशासनाला माहीत नाही. राज्य शासनाने कोविड-१९ च्या संक्रमणामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्याने, सर्व विभागांना अखर्चित निधी सरकारी कोषात जमा करण्याचे निर्देश दिले तेव्हा जि.प.ला या निधीचा उलगडा झाला. ४.७५ कोटीचा निधी परत जात असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला .शाळांमध्ये शालेय पोषण आहार बनविण्यासाठी पूर्वी लाकडाचा वापर होत होता. शासनाने झाडांची कत्तल थांबविण्यासाठी आणि चुलमुक्त शाळा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शालेय पोषण आहार अभियानांतर्गत ४.७५ कोटी रुपयांचा निधी गॅस सिलेंडरसाठी उपलब्ध करून दिला. २०१२-१३ मध्ये हा निधी जि.प.च्या कोषात जमा झाला. तत्कालीन शालेय पोषण आहार विभागाच्या लेखाधिकाऱ्यांनी पंचायत स्तरावर निधीचे वाटप केले. तत्कालीन पोषण आहार अधीक्षकांनी शाळांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्नच केले नाही. शहरातील काही मोजक्या शाळांना त्याचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे केवळ २३ लाख रुपये यातून खर्च झाले. मात्र ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही योजना पोहचलीच नाही. त्यामुळे आजच्या घडीला १६१७ शाळांमध्ये चुलीवरच पोषण आहार शिजविला जातो. विशेष म्हणजे २०१२-१३ पासून हा निधी पडून आहे, याची खबरबात जिल्हा परिषद प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सुद्धा लागली नाही. त्यामुळे हा विषय कधी शिक्षण समितीच्या बैठकीत, स्थायी समिती अथवा जि.प. सर्वसाधारण सभेत उचलण्यात आला नाही. आज अखर्चित निधीचा हिशेब जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीच्या सभापतीकडे मांडण्यात आला तेव्हा त्याचा उलगडा झाला. या निधी बरोबरच पोषण आहार विभागाने १५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी सरकारच्या कोषात जमा केला. विशेष म्हणजे हा निधी शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाने दिला होता.- हा निधी का खर्च झाला नाही, तत्कालीन पोषण आहार अधीक्षकांनी याचा पाठपुरावा का केला नाही. याची माहिती विभागाने का दडवून ठेवली, याची चौकशी होणार आहे. त्यासंदर्भातील चौकशीचे पत्र शिक्षण विभागाला दिले आहे.भारती पाटील, सभापती, शिक्षण समिती, जि.प.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर