४७ वन कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:30+5:302020-12-30T04:11:30+5:30
हिवरा बाजार : पेेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सिल्लारी (ता. रामटेक) येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ...

४७ वन कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
हिवरा बाजार : पेेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सिल्लारी (ता. रामटेक) येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात वन विभागाच्या ४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार बाळासाहेब मस्के, ठाणेदार प्रवीण बाेरकुटे, पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार, सुभाष बडवे उपस्थित हाेते. या रक्तदान शिबिराचे आयाेजन पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, श्रीराम केकान, रातीव मेश्राम, गणेश लामतुरे, दत्तात्रय विभुते, गजानन गरके, आकाश डुकरे, राजीव केंद्रे, आकाश जेंगठे, भारती प्रजापती यांनी केले हाेते. नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयाे)च्या चमूने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.