Nagpur | ३० लाखांच्या खंडणीसाठी ४६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण

By दयानंद पाईकराव | Updated: September 3, 2022 11:20 IST2022-09-03T11:19:33+5:302022-09-03T11:20:38+5:30

प्रदीपची एक्टिवा गाडी ॲलेक्सेस हॉस्पिटल समोर मिळाली आहे.

46-year-old man kidnapped in nagpur for ransom of 30 lakhs | Nagpur | ३० लाखांच्या खंडणीसाठी ४६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण

Nagpur | ३० लाखांच्या खंडणीसाठी ४६ वर्षीय व्यक्तीचे अपहरण

नागपूर : ३० लाखाच्या खंडणीसाठी ४६ वर्षाच्या व्यक्तीचे अपहरण केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

प्रदीप मोतीराम रामानी असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रदीप यांनी रात्री १०.०७ वाजता आपण घरी येत असल्याचा कुटुंबीयांना फोन केला. परंतु बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क केला असता त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. काही वेळानंतर प्रदीपच्या कुटुंबीयांना तीस लाखाची खंडणी मागणारा फोन आल्याची माहिती आहे. दरम्यान प्रदीपची एक्टिवा गाडी ॲलेक्सेस हॉस्पिटल समोर मिळाली आहे. तपास जरीपटका पोलीस करीत आहेत.

Web Title: 46-year-old man kidnapped in nagpur for ransom of 30 lakhs