शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागपूर विमानतळावर ४४ लाखांचे तस्करीचे सोने जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 19, 2023 18:20 IST

नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ

नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नागपूर विमानतळावर एका तस्कराला अटक करून त्याच्याकडून जवळपास ४४ लाख रुपये किमतीचे ७४३.५६ ग्रॅम सोने जप्त केले. डीआरआयने आरोपीचा पासपोर्ट जप्त केला आहे. डीआरआयने हे प्रकरण केंद्रीय सीमाशुल्क विभागाकडे चौकशीसाठी सोपविले आहे.

सचिन चांदोस्कर असे आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर, ठाणे येथील रहिवासी आहे. तो शुक्रवारी पहाटे एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याने हे सोने पेस्ट स्वरूपात अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. एअर अरेबियाच्या विमानातून सोन्याची तस्कर आल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली. अधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळावर सापळा रचला.

अधिकाऱ्यांना एका प्रवाशाच्या चालण्याचे हावभाव संशयास्पद वाटले. डीआरआयने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्या अंडरवेअरमध्ये लपवलेले ७४३.५६ ग्रॅम सोने सापडले. ते सोने पेस्ट स्वरूपात होते. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासल्यानंतर तो दुबईहून अनेकवेळा भारतात आल्याचे आढळून आले. तो शारजाहून प्रथमच नागपुरात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीमाशुल्क विभागाने एका सोन्याच्या तस्कराला अटक केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंSmugglingतस्करीDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर