शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

४२ खाणींची भर पडणार

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

मिश्रा म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले प्रकल्प सुरू करता न आल्याने उत्पादनात घसरण झाली.

नागपूर : मिश्रा म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले प्रकल्प सुरू करता न आल्याने उत्पादनात घसरण झाली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला. पण ऊर्जा निर्मिती क्षेत्राची गरज पूर्ण करण्यासाठी वेकोलिने कोळसा उत्पादनावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी केली आहे. जागा अधिग्रहणातील अडथळे दूर करणे, मानव संशोधनाची पुनर्निर्मिती करणे, प्रशासनाची कार्यक्षमता आणि कोळशाची क्षमता वाढविण्यावर विशेष भर आहे. यावर्षी ७ दशलक्ष टन कोळशाची क्षमता वाढविली आहे आणि २०२० पर्यंत सध्या सुरू असलेल्या ८२ खाणींमध्ये नव्याने ४२ खाणींची भर पडणार आहे. त्यामुळे कोळशाची उत्पादन क्षमता १०० दशलक्ष टनापर्यंत वाढणार असल्याचे मिश्रा म्हणाले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि सरचिटणीस शिरीष बोरकर आणि वेकोलिचे महाव्यवस्थापक (जनसंपर्क) मनीष सिंग उपस्थित होते. (प्रतिनिधी) गावकऱ्यांचा विश्वास संपादनस्थानिक गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी वेकोलितर्फे ‘संवाद’ नावाने विशेष प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वेकोलिच्या खाणींतून दरदिवशी निघणाऱ्या १० कोटी गॅलन पाण्याचा उपयोग स्थानिक लोकांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बोअरवेल खोदणे, बंधारे बांधणे आणि टॅन्क बांधून हे पाणी गावातील विहिरीत आणि अन्य पाणी साठवणुकीच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. नायगाव येथे पायलट प्रकल्प यशस्वी झाला आहे. गेल्या सहा महिन्यात काही हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. याशिवाय हा प्रयोग प्रत्येक खाणीत करून पुढील पाच वर्षांत विदर्भातील २५०० ते ३००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा दावा मिश्रा यांनी केला.