शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह असलेल्या ४० ते ५० टक्के लोकांना लैंगिक समस्या!

By सुमेध वाघमार | Updated: June 5, 2024 19:24 IST

कामेच्छा केंद्रावर होतो परिणाम होतो : हॅलो डायबेटिस आंतरराष्ट्रीय परिषद

सुमेध वाघमारे नागपूर : मधुमेह नियंत्रित नसल्यास किंवा बराच कालावधीपासून हा आजार असलेल्या जवळपास ४० ते ५० टक्के लोकांमध्ये लैंगिक समस्या येऊ शकते. मधुमेहामुळे ‘प्रोलॅक्टिन’ रसायन वाढते. तसेच पुरुषत्वाचा ‘सेक्स हॉर्मोन’ ‘टेस्टोस्टेरॉन’ही कमी होत जाते. परिणामी, कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होते. मधुमेहींच्या कामसंबंधांमध्ये अंतर पडत जाते. दाम्पत्यांच्या संबंधांवरही विपरीत परिणाम होतो. यावर उचपार आहेत. परंतु अनेक रुग्ण लैंगिक समस्या सांगत नाही आणि अनेक डॉक्टरही त्यांना विचारीत नाही, अशी खंत मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी व्यक्त केली. 

‘हॅलो डायबेटिस’ आंतरराष्टÑीय परिषद नागपुरात ७ जूनपासून होऊ घातली आहे. त्याची माहिती देणसाठी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. गुप्ता बोलत होते. यावेळी ‘डीएआय’चे डॉ. अमोल मेश्राम, आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता उपस्थित होत्या. डॉ. गुप्ता म्हणाले, सुनील डायबिटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमीटेड, डायबेटिस केअर फाऊंडेशन आॅफ इंडिया, डायबेटिस असोसिएशन आॅफ इंडिया (डीएआय) नागपूर यासह इतरही संस्थांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाºया या परिषदेत सात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यात  लैंगिक बिघडलेले कार्य या विषयावर भर दिला जाणार आहे. या शिवाय, डायबेटिक फूट, इन्सुलिन इंजेक्शनचे तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, न्यूट्रिशियन आणि केवळ महिला डॉक्टरांसाठी व्यायाम या विषयावर कार्यशाळा होणार आहे. परिषदेत, पाच पद्मश्री डॉक्टरांचा सहभागही राहणार आहे. 

लग्नापूर्वी मधुमेहाची चाचणी आवश्यकडॉ. गुप्ता म्हणाले, लग्नापूर्वी जसे आपण सिकलसेल, थॅलेसेमियाची चाचणीवर भर देतो तशीच मधुमेहाची तपासणी करायला हवी. कारण, पाश्चात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडे १० वर्षांआधी मधुमेहाचे निदान होते. अलिकडे मुली उशीरा लग्न करत असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. त्यात गर्भ राहिल्यास त्याचे निदान होण्यासही उशीर होतो. परिणामी, होणारे बाळ व्यंग घेऊन जन्माला येण्याचे, प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याची, गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याचे किंवा कमी दिवसांचे बाळ जन्माला येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी लग्नापूर्वी मधुमेहाची चाचणी आवश्यक आहे. लग्नापूर्वी मधुमेहाचे निदान झाल्यास योग्य उपचाराचा मदतीने निरोगी बाळाला जन्म देण्यास मदत होते. 

८५ टक्के पुरुषांना, ६३.३ टक्के महिलांना लैंगिक दोष ‘‘टाईप २’ मधुमेहाच्या स्त्रीयांमध्ये लैंगिक संबंधातील अडथळे यावर शोधनिबंध सादर केला होता. यात १००३ पुरुषांमध्ये तब्बल ८५ टक्के पुरुषांना, तर २६४ महिलांमध्ये ६३.३ टक्के महिलांना लैंगिक दोष असल्याचे आढळून आले, अशी माहितीही डॉ. गुप्ता यांनी दिली.

टॅग्स :diabetesमधुमेहSexual Healthलैंगिक आरोग्यHealthआरोग्यnagpurनागपूर