शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ट्रकमध्ये वरून कोळशाची राख, चोरकप्प्यात दारूचे घबाड; ४० लाखांची प्रतिबंधित दारू जप्त

By नरेश डोंगरे | Updated: June 25, 2024 22:46 IST

‘पुष्पा’स्टाईल दारूची तस्करी : ट्रकमालक फरार, चालक, वाहक गजाआड

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ट्रकमध्ये चारही बाजूला कोळशाची राख आणि आतमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात दारूचे घबाड, अशा प्रकारे प्रतिबंधित विदेशी बनावटीच्या दारूची 'पुष्पा स्टाईल' तस्करी करणाच्या टोळीचा छडा आज राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने लावला. ट्रकसह ४० लाखांची दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाची अलिकडच्या कालावधीतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू निर्माण केली जाते. ही दारू बनावट मानली जाते. ती आरोग्यास अपायकारक असल्यामुळे ईतर राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असते. तिला केवळ मध्य प्रदेशातच विकण्याची परवानगी असल्यामुळे त्याच ब्राण्डच्या दारूच्या तुलनेत या दारूची किंमत फारच कमी असते. त्यामुळे नागपूरसह ठिकठिकाणचे मद्य तस्कर ही दारू बोलवून बिनधास्तपणे हॉटेल, बार, रेस्टॉरेंट आणि ढाब्यावर विकतात. अशाच वेगवेगळ्या ब्राण्डच्या दारूची मोठी खेप नागपुरात येणार असल्याची टीप एक्साईजच्या स्थानिक अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे अधीक्षक सूरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईच्या पथकाने ऑटोमोटीव्ह चाैक ते कळमना मार्गावर विनोबा भावे नगरात सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ट्रक क्रमांक एमएच ४०/ सीडी २२६० टप्प्यात येताच तो थांबविण्यात आला. ट्रकची पाहणी केली असता त्यात कोळशापासून तयार झालेली राख भरून दिसली. आतमध्ये तपासले असता राखच राख दिसली. त्यामुळे तपासणी करणारे पथक चक्रावले. त्यांनी ट्रकमध्ये काहीच नसल्याचा अंदाज बांधला.

अन् चोर कप्पा आढळला

ट्रकच्या कॅबिनची कसून तपासणी केली असता चालकाच्या सीटमागे प्लायवूड लावून दिसले. संशय आल्याने ते बाहेर काढले असता त्यातून एक चोर दरवाजा आढळला. आतमध्ये ५ फुट उंच, १५ फुट लांब आणि ट्रकचा गाला ज्या आकाराचा, त्या आकाराचे एक भुयार कम लॉकर आढळले. त्यात मोठ्या प्रमाणात बियर कॅन आणि वेगवेगळ्या ब्राण्डची दारू आढळली. ती जप्त करून ट्रकचालक सतिश दिलीप सोनवणे तसेच सहायक योगेश जानरावजी धुर्वे या दोघांना अटक करण्यात आली. हा ट्रक विशाल आनंद जांबुळकर याच्या मालकीचा असून, तो फरार आहे. या टोळीत अनेक मद्य तस्करांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.

जप्त करण्यात आलेली बियर आणि दारू

ले माउंट ब्रण्डच्या ५०० मिलीच्या ७२० बिअर कॅन, 'गोवा' व्हिस्कीच्या १८० मिलिच्या १२५०० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८० बाटल्या आणि इंम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलिच्या ४८० बाटल्या. ही सर्व दारू, ट्रक दोन मोबाईलसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ४० लाख, ५१ हजार रुपये आहे. एक्साईज एसपी सुरजकुमार रामोड, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितिय निरीक्षक रणधिर गार्दैडे तसेच मंगेश कावळे, शैलेश अजमिरे, मोहन पाटील, उमेश शिरभाते, योगेश यलसटवार, शिरीष देशमुख, समिर सईद, विनोद ठाकुर, प्रशांत घावळे, स्नेहा पवार, धवल तिजारे आणि देवेश कोठे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी