पहिल्या वाढदिवसापूर्वीच हजारातील ३८ मुलांचा मृत्यू : डॉ. संजय झोडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 08:08 PM2018-01-06T20:08:35+5:302018-01-06T20:20:06+5:30

शून्य ते एक वर्षाखालील एक हजार मुलांमधून ३८ मुले आपला पहिला वाढदिवसही पाहू शकत नाही. त्यांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होतो , अशी माहिती नवी दिल्ली येथील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. संजय झोडपे यांनी येथे दिली.

38 children died in the first birthday: Dr Sanjay Zoadpe | पहिल्या वाढदिवसापूर्वीच हजारातील ३८ मुलांचा मृत्यू : डॉ. संजय झोडपे

पहिल्या वाढदिवसापूर्वीच हजारातील ३८ मुलांचा मृत्यू : डॉ. संजय झोडपे

Next
ठळक मुद्देएक वर्षाखालील बालमृत्यूचा दर इतर देशांच्या तुलनेत भारतात मोठा५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शून्य ते एक वर्षाखालील एक हजार मुलांमधून ३८ मुले आपला पहिला वाढदिवसही पाहू शकत नाही. त्यांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होतो. तर पाच वर्षापर्यंतच्या हजार मुलांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण ४५ आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील बालमृत्यूचा हा दर फार मोठा आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने एकच उपचार पद्धती असावी यासाठी ‘नॅशनल हेल्थ पॉलिसी’अंतर्गत ‘इक्विटी’ उपचारपद्धतीचा समावेश केला आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. संजय झोडपे यांनी येथे दिली.
५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’च्या तिसऱ्या दिवशी, शनिवारी डॉ. झोडापे यांनी बालमृत्यूवर चर्चा केली. यावेळी डॉ. उदय बोधनकर, डॉ. अविनाश गावंडे व डॉ. सुचित बागडे उपस्थित होते.
डॉ. झोडपे म्हणाले, भारतात सर्वाधिक बालमृत्यू हे उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा या राज्यात जास्त दिसून येतात. श्रीलंका व थायलंड देशाच्या तुलनेत भारतात बालमृत्यूचा दर मोठा आहे. हा दर कमी करण्यासाठी विशेषत: ग्रामीण, दुर्गम भागात ‘इक्विटी’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिथे बालमृत्यू दर जास्त आहे त्या भागात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. सोबतच मातामृत्यू दर कमी करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांसाठी एक ‘ब्रीज कोर्स’ सुरू करण्यात आला आहे. प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्यास या डॉक्टरांची मदत होईल, असेही डॉ. झोडपे म्हणाले.

Web Title: 38 children died in the first birthday: Dr Sanjay Zoadpe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.