शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

भूसंपादनाचे ३७१ कोटी राज्य सरकारकडे अडले : महापौरांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 8:40 PM

शासनाकडून अद्यापही ३७१.८३५ कोटी निधी अप्राप्त आहे. हा निधी आला नसल्यामुळे रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागपूर  महापालिकेला प्रतीक्षा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील पाच रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र, त्यातील बाधितांना द्यावयाच्या रकमेपैकी ७० टक्के रक्कम शासनाकडून अपेक्षित आहे. महापालिका यासाठी एकूण रकमेच्या ३० टक्के रक्कम देणार होती. मात्र, त्यापेक्षा अधिक रक्कम नागपूर महापालिकेने खर्च केली आहे. राज्य शासनाकडून अद्याप ३७१.८३५ कोटींचा निधी प्राप्त झालेला नाही.महापौरसंदीप जोशी यांच्या गांधीबाग झोन येथील जनता दरबारात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील केळीबाग रोड, पारडी रोड, जुना भंडारा रोड, रामजी पहेलवान मार्ग, वर्धा रोड-अजनी-सोमलवाडा या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामांची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व मार्ग मोकळे करण्याकरिता एकूण ६४२.०५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी राज्य शासन ७० टक्के अर्थात ४४९.४३५ कोटी इतका निधी देणार असून नागपूर महानगरपालिकेचा वाटा ३० टक्के अर्थात १९२.६१५ कोटी इतका आहे. रस्ता रुंदीकरणाचे कार्य युद्धपातळीवर करून नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर कमी व्हावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर महापालिकेने यासाठी अपेक्षित ३० टक्क्यांच्या वर खर्च केला असून आतापर्यंत ही रक्कम १९२.६१५ च्या तुलनेत २५६.०२ कोटींवर गेलेली आहे.शासनाकडून आवश्यक ४४९.४३५ कोटी निधीच्या तुलनेत आतापर्यंत शासनाने केवळ ७७.६० कोटी इतकाच निधी मनपाकडे वळता केला आहे. अर्थात शासनाकडून अद्यापही ३७१.८३५ कोटी निधी अप्राप्त आहे. हा निधी आला नसल्यामुळे रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. नागपूर महापालिकेने जवळपास त्यासाठीच्या सर्वच प्रक्रिया पूर्ण केल्या असून पुढील कार्यवाहीसाठी निधीची वाट बघत आहे. यासाठी आता मनपा आयुक्त आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी दिले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGovernmentसरकारfundsनिधी