शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

देशातील ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात; विदर्भात २०२२ मध्ये सुमारे हजार आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: December 21, 2022 15:17 IST

राज्य शासनाच्याच आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर

नागपूर :शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे प्रशासनातर्फे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही प्रकरणे कायम आहे. २०२१ साली देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ३७ टक्के घटना या महाराष्ट्र राज्यातील होत्या. सरासरी प्रत्येक तीन आत्महत्यांमागे एक आत्महत्या राज्यात झाली होती. राज्य शासनाच्याच आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

विधानपरिषदेत डॉ.सुधीर तांबे, राजेश राठोड, अभिजीत वंजारी, अनिल परब इत्यादी सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरानुसार, २०२१ साली देशभरात १० हजार ८८१ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. त्यातील ४ हजार ६४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या होत्या. यात २ हजार ६४० शेतकरी व १ हजार ४२४ शेतमजूर होते. अगदी हिवाळी अधिवेशनाअगोदर म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत ४९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

नागपूर, अमरावती, यवतमाळमध्ये दाहकता कायम

सरकारच्या आकडेवारीनुसार नागपूर व अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांची दाहकता काम आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत विदर्भात ९९१ आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. यापैकी अमरावती विभागात ७४९ व नागपूर विभागात २४२ प्रकरणे होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू