इंटरलॉकिंगमुळे मध्य रेल्वेच्या ३४ गाड्या रद्द, २० गाड्यांचे मार्ग वळविले
By नरेश डोंगरे | Updated: August 12, 2023 14:58 IST2023-08-12T14:57:07+5:302023-08-12T14:58:18+5:30
१४ ते १५ ऑगस्ट दरम्यान १५ तास रेल्वे वाहतूक ब्लॉक : सहा गाड्या शॉर्ट टर्मिनेट

इंटरलॉकिंगमुळे मध्य रेल्वेच्या ३४ गाड्या रद्द, २० गाड्यांचे मार्ग वळविले
नरेश डोंगरे
नागपूर : मध्य रेल्वेच्या १८३.९४ किलोमिटर लांबीच्या भूसावळ मनमाड दरम्यान थर्ड लाईनचे हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने या कालावधीसाठी ३४ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सहा गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून तब्बल २० गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहे.
१४ ते १५ ऑगस्ट दरम्यान १५ तास रेल्वे वाहतूक ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने धावणाऱ्या सुमारे ६० ते ६५ गाड्या प्रभावित झाल्या आहेत. हा अडथळा लक्षात घेता नमूद कालावधीसाठी देवळाली भूसावळ एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड एक्सप्रेस, इगतपुरी-भुसावळ मेमू, सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्सप्रेस, पुणे- जबलपूर एक्सप्रेस, दादर-गोरखपूर एक्सप्रेस, मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई- आदिलाबाद एक्सप्रेस, पुणे-नागपूर एक्सप्रेस, पनवेल-रीवा एक्सप्रेस, पुणे-नागपूर एक्सप्रेस मुंबई- नांदेड एक्सप्रेस, मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, पुणे-भुसावळ एक्सप्रेस त्याच प्रमाणे परतीच्या मार्गावरच्या याच सर्व गाड्या १४ ते १५ ऑगस्टला करण्यात आल्या आहेत. तर, सहा गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.